Friday, 9 October 2020

५५. वाटले नव्हते

वाटले नव्हते तुफानी 
पावसात नाव ही मिळेल
वाटले नव्हते दुष्काळात
वेलीवर फुल ही फुलेल
वाटले नव्हते असे दूरचे 
शिखर नजरेत भरेल
वाटले नव्हते इतक्या लवकर
अंतर तिथले सरेल
वाटले नव्हते वेचता वेचता
शब्द माझा उरेल ...

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

चांदणी

चांदणे गोड हासत आहे आकाश रिते भासत आहे मौनात सुद्धा संगीत आहे एक गोष्ट नवी सांगत आहे तरल मधुर गाणे आहे गाण्यात मग्न होणे आहे चिंब होत ...