Sunday, 13 October 2024

१०६. भेट

चिंब झाले एक मन चिंब एक पाहुणा
कोणत्या ऋतूतली भेट ही सांग ना

रोजच्याच पावसात वेगळे भिजायचे
दूर त्या ढगास गुज मनातले कळायचे
क्षणिक भेट आपली *क्षणिक* विरह वेदना

जागल्या अजाण आज आशा अभिलाषा
अबोल या मनातल्या बोलक्याच भाषा
एक तीच आठवण एक ती संवेदना

पाहतात वाट हे काळे ढग आकाशी
जोडली अशीच नाळ त्यांनी ही माझ्याशी
एक तो हा पाऊस एक तो हा पाहुणा 

- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...