जुई, मोगरा, चाफा फुलला
कळ्या उमलल्या दारोदारी
गळून पडल्या फांद्यांवर
हिरवी पाने सजली सारी
मोहरलेले झाड सांगते
वसंतातली किमया सारी
गुलमोहराचे रान रंगले
बहावा सजला वाटेवरी
पानगळीच्या दिवसांनंतर
सुरु जाहली वसंत वारी
- ©®जुई
" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
ती क्रांती ची मशाल
नात्याची भक्कम ढाल
बदलला तिने ही काळ
सर सुखाची ती वेल्हाळ
झळकते त्यागाने भाळ
केले आयुष्य तिने बहाल
अशी लक्ष्मीबाई....
तिच्या सोबतीने
घडला क्रांतीचा इतिहास
साक्षरतेचा ध्यास
वंदन तिजला आज
स्मरण तिचे दिनी खास
अशी लक्ष्मीबाई...
वाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली निबीड रानात वाट माझी नागमोडी डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या सघन खोऱ्यात वाट माझी भाव...