वाटेत तेव्हा जाता जाता
टाळ वाजवत आलेला
शुभ्र पांढरा सदरा आणि
टोपी होती डोक्याला
टिळा कपाळी होता त्याच्या
विठूच आला भेटीला
चार पुस्तके अभंगाची
बाकी नव्हते गाठीला
विचारले मी त्याला तेव्हा,
" कसे वाटले वारीत तुला ? "
" सोबत तुझ्या रखमा नाही "
" तिचा कुठे रस्ता चुकला ? "
हरिनामात गुंग झाली
पहा कशी ही तर वारी
रखुमाई ती वाट पाहते
एकटी आहे रे पंढरी
घास घेतले या वाटेवर
गोड अन तिथली भाकरी
भाकर तुकडा घेऊन तिकडे
उभी उपाशी रुक्मिणी दारी
रमला जीव इथे तुझा
करते विठ्ठला मनधरणी
भेट तिला ही लवकर आता
बोलावते तुज तिथे रुक्मिणी
- जुई