Monday, 25 September 2023

९८. किनारा

 सागराने घातलेले एक कोडे या नदीचे  

 वाहणाऱ्या नदीची का सागराशी भेट होते ?


उंच लाटा सागराच्या, ते निळेसे अंतरंग 

जोडले जाते नदीचे सागराशी भावबंध


सागराची हाक तेव्हा या नदीला सांगते की

का नदी ही सागरा रे मिसळूनी उरतेच बाकी

 

वेगळेपण या नदीचे सांगतो हा धुंद वारा

वाहणाऱ्या नदीसाठी, थांबलेला तो किनारा


- जुई


उंच लाटा सागराच्या, ते निळेसे अंतरंग

जोडलेले  या नदीचे सागराशी भावबंध              

- जुई 💙



वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...