Sunday, 24 April 2022

८०. सचिन तेंडुलकर

मैदान बोलावत होते
जायचेच होते पक्के इरादे 
हार - जीत चे शल्य सोबत 
हे पाऊल नव्हते तितके साधे 
आंदोलने मनाची पार करत 
विकेट घेतली हरण्याची
झेलला चेंडू जिंकून त्याने
सीमा पार केली यशाची
 " सचिन तेंडुलकर "
 - जुई 

Saturday, 16 April 2022

कशाला

वाटले आता फुलावे
पान पानानां कशाला
वेगळे वाटून त्याचे
सोहळे आणि कशाला

नेहमीचा गारवा हा
सोबतीला राहणारा
वाढलेल्या या उन्हाला
रुक्ष होऊनी पाहणारा

सांगतो आता फुलाला
थांबना घाई कशाला
बोलवावे पावसाने
ओल ही आणि कशाला

येत आहे वाटणारे
भाव वेडे मग कशाला
भेट होते गाठ होते
थांबणे आणि कशाला

- जुईली अतितकर

Thursday, 7 April 2022

७९. अनोळखी कादंबरी

ओळखीची एक वाट
अनोळखी एक गाव
ओळखीच्या पाटीवर
अनोळखी एक नाव

ओळखीच्या होडीतून 
अनोळखी तो प्रवास
ओळखीच्या गाठीभेटी
अनोळखी सहवास

ओळखीच्या पानावर
अनोळखी अष्टाक्षरी
ओळखीची चार पाने
अनोळखी कादंबरी 

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...