Tuesday, 14 June 2022

८३. उधाण

मी ही चालत होते
मागे मागे ते ही चालत आले
थोडे पुढे धावले 
समोरून वेगात त्यांचे धावणे झाले
आनंदाच्या भरात भिजून
मी आत आत शिरत गेले
त्यांना ही उधाण आले होते तेव्हा
एकमेकांत ते ही विरत गेले.
पुढे मग मी सावरत गेले 
उसळून आलं त्यांना ही 
शांत करत हरवत गेले
भेटीची आमच्या ही 
आली एकमेव संधी
सभोवती माझ्या 
किनाऱ्यावर
त्या लाटांचीच गर्दी

- जुईली अतितकर

Sunday, 5 June 2022

८८. मैत्री

प्रेम, जिव्हाळा, अन बागडणे असते मैत्री
हसणे, रडणे, उगाच रुसणे असते मैत्री

वेगवेगळ्या रस्त्यावर पण असंख्य वाटा
वाटेवरती पुन्हा भेटणे असते मैत्री

हातावरची पाचच बोटे सोबत जेव्हा
जोडत जोडत शंभर बनणे असते  मैत्री

आनंदाच्या डोही उरते मुकी भावना
कर्ज अश्रुंचे अन गहिवरणे असते मैत्री
 
भूक लागल्या पोटासाठी दूर राहुनी
घास वेगळे रोज ठेवणे असते मैत्री

कणाकणाने वाढत जावी नशा निराळी
नव्या ठिकाणी " ती " आठवणे असते मैत्री

शिंपल्यात ही अचुक पडावे थेंबाने मग
मोती व्हावे अशी चमकणे असते मैत्री

- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...