Sunday, 16 May 2021

७६. पालवी सुखाची


बघ झाडावरती आल्या
ओझरत्या तांबुस ओळी
पिकलेले पिवळे आंबे
वरती हिरवीशी झोळी

आवाज त्यात पानांचा
वाऱ्यावर धावत होती
फांदीची एक डहाळी
ओंजळीत उतरत होती.

त्या दूरदूरच्या बागा 
केशरात धुळवड सारी
ठिपके मी जोडत गेले
रांगोळी सजली दारी

दिसतात त्या तिथे मजला
मातीच्या पाऊल खुणा 
ढेकळे फोडुनी त्यांची
रोपटे डोकवे पुन्हा

आल्यात उन्हाच्या रेषा
सावली त्यात ही देती
सुकल्या फांद्यांवरती ही 
पालवी सुखाची होती.

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...