" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
Thursday, 24 July 2025
१२४. एवढेच मागे उरते
आषाढ घेऊनि आला
घन गर्द निळ्या आकाशी
वाहून आणल्या कोणी
भरून जळाच्या राशी
सजलेला श्रावण गातो
मृदू मालकंस, मल्हारी
हरवून दवाच्या मागे
यमनामधल्या ओळी
नक्षत्राच्या वर धरती
चमचमत्या दीप माळा
मिळे धरेला तृप्ती मग
पूर्ण होतसे सोहळा
त्या रिक्त मोकळ्या गगनी
मग रंगीत कमान धरते
त्या अधीर कातर वेळी
एवढेच मागे उरते...
- जुई
Subscribe to:
Posts (Atom)
वाट माझी
वाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली निबीड रानात वाट माझी नागमोडी डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या सघन खोऱ्यात वाट माझी भाव...
-
दूर तिथे त्या सीमेवर तो काल लढला होता शहीद झाला तरीही तो शत्रूला भिडला होता देश आणि वेस तेव्हा सारेच धोक्यात होते एक निशाणा त्याने तेव्ह...
-
माझ्या मना लाभो तुला आंनदाचे देणे माझ्या मना नको शोधू कुणातले उणे माझ्या मना रमावे तू समाधानाकाठी माझ्या मना जपावे तू तुला स्वतः साठी माझ्या...
-
वाटेत आहे एक तळे त्या निळ्या तळ्याकाठी रोज पाहुणे येते कोण कोण येते कशासाठी तळ्याकाठी डोलत असती इवली पिवळी गवतफुले झाडांच्या असतात कमान...