Wednesday, 30 April 2025

१२२. कृष्ण तिथे अंतरी

लोभस दिसता रूप हरीचे

डोळा येते भरती

मोरपिसाचे मुकुट साजिरे

नक्षी भाळावरती


कृष्णलीला गोविंदाच्या

पाहते माय यशोदा

नटखट कान्हा लळा लावतो

वेडी होते राधा


कृष्ण सापडे सुदाम्यामध्ये

कृष्ण राज दरबारी

कृष्ण भेटतो राधेमध्ये

कृष्ण यशोदे घरी


रूप हरीचे प्रत्येकाला

दिसे वेगळे जरी

जिथे नांदती सौख्यभरे

कृष्ण तिथे अंतरी


- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...