Sunday, 22 November 2020

६४. चित्र माझे


मिळाले मला चित्र जरासे अपुरे जरासे अधुरे
जणू रंग त्याचे मनाच्या तळाशी असावेत ओले

दिसावे बिलोरी सुखाचे  ते रंग या पानात कोऱ्या 
जुळाव्यात रेषा मनाच्या मनाशी कथा सांगणाऱ्या

उरावी न सीमा विरोधी छटांना मनाच्या कधीही
चितारुन येतीत नक्षी फुलांच्या ही पानी कुठेही

निराळ्या त्या रंगात एकाच रेषेत मिसळून जावे 
भरावेत रंग ओले, चित्र माझे रंगीत व्हावे

- जुईली अतितकर


Friday, 6 November 2020

६२. झाला गुगल माझा गुरू


धावते आज जग माझे
कसे तुला मी विसरू
आला आहेस हाती आमच्या
झाला गुगल माझा गुरू

नसे कधी जर वेळ कुणाला
शंका मग कसे विचारू
उत्तर त्याचे मिळतील मजला
झाला गुगल माझा गुरू


मोठ्या तुझ्या जाळ्यात 
ज्ञानाची भूक लागली सरू
भरलेल्या या पानावर
झाला गुगल माझा गुरू

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...