Sunday, 2 January 2022

७७. मला कळाले

वाटत गेली गंमत जेव्हा बोलण्यातली
किती कुणाला वाचत जावे मला कळाले

लख्ख प्रकाशा रोख तुझाही डोक्यावरती
किती उन्हाने जाळत जावे मला कळाले

किती गारवा ओढून घ्यावा अधरावरती
किती कुणावर भाळत जावे मला कळाले

अवघड गणिते कुठे कुठे तर येतच होती
कितीक सोपे वाटून घ्यावे मला कळाले

किती वेगळे वाटत गेले पुढे पुढे अन
किती सारखे वाटून घ्यावे मला कळाले

- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...