माझ्या मना नको शोधू कुणातले उणे
माझ्या मना रमावे तू समाधानाकाठी
माझ्या मना जपावे तू तुला स्वतः साठी
माझ्या मना छंद दे रे उदासीन क्षणी
माझ्या मना धैर्य दे रे नको डोळा पाणी
माझ्या मना तुझ्यासाठी तूच गाणे गावे
माझ्या मना तुझ्यापाशी मी ही शांत व्हावे
माझ्या मना शोध तुझा तूच घे एकदा
माझ्या मना आठव तू जिकंले कितीदा
माझ्या मना नको होऊ बैचेन अवेळी
माझ्या मना रीती तुझी भरेल पोकळी
माझ्या मना आठव तू मागची कहाणी
तुझ्यासाठी आनंदात असते रे कोणी
- जुई