असे ही असावे तसेही असावे
कळेना मला हे कुणी का रुसावे
निळ्याशार पाण्यात टाकून धोंडे
कशाला उगा ते उफाळून यावे
जरी डोह वेल्हाळ वेल्हाळ भासे
तरी आज नावेस काठास न्यावे
निघावे पुढे द्वेष सोडून मागे
नदीच्या प्रवाहात वाहून जावे
असे वाढलेले समोरील सारे
कडू गोड सारेच चाखून घ्यावे
कधीचे हरवले मिळेना मलाही
हसू तेवढे ते अताशा दिसावे
- जुईली अतितकर