Wednesday, 15 February 2023

९४. आठवणी

असतात इतक्या 
गडद आठवणी 
जितके रंग
फुलांचे गडद 
झुलणारे स्वप्न
पोपटी फिकटसे 
पाने ही तेव्हा
दिसतात गडद 

- जुई

Thursday, 2 February 2023

९५. ओळ उरलेली

मी मलाच विसरुन जाते
तू रोज नवा कळताना
मी तुझ्यात मिसळुन जाते
अंतर इतके असताना

मी तुझीच होउन जाते
जणु कळीफुलाचे देठ
मी तुलाच समजुन जाते  
वाहत्या नदीचा काठ

मी तेव्हा सांगत होते
का मनास माझ्या काही
जे तुझ्यात लपले होते
समजले मला का नाही


मी तुझ्यात बाकी उरते
ओंजळ माझी भरलेली 
मी साधी कविता लिहिते
ती ओळ तुझी उरलेली

- ©®जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...