Saturday, 26 November 2022

९३. बोलणारे शब्द असतील

बोलणारे शब्द असतील 
त्यातला तू पर्याय हो
ग्रंथ ही अगणित असतील 
त्यातला तू अध्याय हो

गर्दीच आहे चोहीकडे
त्यातला तू समुदाय हो
हात नाहीच सोबतीला 
तर धावणारा पाय हो

पोसणारा बाप आहे
तू बिलागणारी गाय हो
कठीण जर काळीज त्यांचे
तर तू दुधाची साय हो

सामर्थ्य इतके ठेव की
लढण्यात तू शिवराय हो
दे प्रेरणा अथवा कुणा
त्याची जिजाऊ माय हो


- जुई 

Sunday, 13 November 2022

९२. निरोप कळवा

माझ्या पायी छुम छुम पैंजण
तिच्या खोल पायाच्या भेगा
माझी सतत नवी नवलाई 
तिची बंदिस्त किचनची जागा
लाटले दुःखास तिने अन
वाढले आमचे ताट कितीदा
आठवणींचा चटका आहे 
शोधते पदराचा काठ साधा
माझ्या मृदू हाताचा स्पर्श 
तिचा झिजलेला हाताचा तळवा
सतत असे मनाला रुख रुख
आईस माझा निरोप कळवा

- जुई

Sunday, 6 November 2022

एक मुलाकात

घुमके आये एक रास्ता
एक गली और एक चौखट
एक चौखट एकसा कोना
एक दरवाजा एक करवट

घुमके आये एक गाव
एक मोहल्ला एक शहर
एक शहर मे था वहा पे
अजनबी किसी का एक घर

घुमके आये एक कहानी
एक किस्सा एक सफर
एक सफर और एक साथ
एक बात हुई बेहतर 

घुमके आये एक दौर
एक जशन एक त्योहार
एक सुहानी महफिल
एक खुशी एक परिवार

घुमके आये एक दिन 
एक चांद और एक रात
एक अनोखी दूर किसी की
नई नई सी एक मुलाकात

- जुई

एक डोर

एक डोर बांध लेता दिल से 

जुड जाते शायद ये हिस्से

गलत डोर उठाई तुने

बदल गये सारे किस्से


भरी रखी थी ' तेरी किस्मत '

तुने नजर उठाई नहीं

थोडा उठकर देख लेता

आवाज तुने लगाई नहीं


ढलता सूरज रोज है

मगर सुबह भी तो आती है

तेरी 'अन सुनी ' कहानी

मुझे सब कुछ बताती है

आज ...

मुझे सब कुछ बताती है


- जुईली अतितकर

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...