हरवणे जरी हाती नाही
अन तुला मी पाहत बसते
हरवले जे दिसते काही
समजते मग नकळत सारे
लागते ती हुरहूर का रे
सांग ना जीव जडतो का रे...
सांग ना रे...
भास हा आहे तुझा
की स्पंदनाचा थवा
कळते न आता मला
खेळ हा आहे कसा
सांग तू माझा होशील का ?
साथ जन्माची देशील का ?
हात हाती घेऊन माझा
अंतरी ठाव तू घेशील का ?
भटकते का मन हे माझे
राहते ना कुठले ओझे
सांग ना तुझं कळते का रे
सांग ना रे ...
- जुई