Friday, 20 May 2022

८२. आई

ती पाहते...
कळीचे फुल होताना
ती जगते...
नव्या नव्या रोपट्याला 
त्याच्या पानांना, फुलांना जपताना
ती हसते...
त्याच्या आनंदी सावलीत राहताना
ती रडते...
तो एकटेच उन्हात सुकताना, वाळून जाताना
ती उरते...
माती होऊन सतत त्याच्या अवतीभवती
कारण ती आई असते
मातृदिनाच्या शुभेच्छा .... आई ❣️
- जुई

Friday, 6 May 2022

८१. अवकाश

चालताना चालताना
एकदा पण सावरावे
वाट चुकली चालताना
तर कशाला घाबरावे 

रात्र येते सायंकाळी
चांदणे ही पांघरावे
दिसत नाही मागचे मग
सूर्य इथले मावळावे

मीच द्यावे, मीच घ्यावे
शब्द त्यातच संपवावे
पंख त्यांचे पाहताना
अवकाश पण मीच व्हावे...

- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...