Sunday, 25 September 2022

नकल


चाहे रंग वही या रूप वही
चाहे मिले किसी से शकल
फर्क तो तभी होगा जभी
दिखे स्वभाव ओर अकल
मंच पे ही होगी तालिया 
करोगे किसी की तुम नकल
जिंदगी का एकसा पन्ना 
ढुंडने मे कैसे होंगे सफल ?

- ©®जुईली अतितकर



Friday, 23 September 2022

१०७. राधा हरी वर भाळली


निळ्या आभाळी छटा वेगळी
भरते अंतरी एक पोकळी
शब्द भरले भाव उरले
राधा हरीवर भाळली...

तरंग उठले नदी किनारी
मनात उरते मंद बासरी 
सावळ छाया मज भिजवाया
बरसून अंगणी गंधाळली

राधा हरीवर भाळली...

- जुई

८६. ती असणे

काळ्या करड्या मातीवरती
रांगोळी ही आवडते तिला
शुभ्र पांढऱ्या पानावरती
रंगवणे ही आवडते तिला

निळ्या मोकळ्या या आकाशी
थवे पाहणे आवडते तिला
संथ प्रवाही नदीसारखे
वाहत जाणे आवडते तिला

इतके साधे सोपे गणित पण
अवघड करणे आवडते तिला
तिचे हरवणे, शोधत बसणे
अता अताशा आवडते मला

तिला वाचणे, लिहिणे आणि
पाहत बसणे आवडते मला
कसे कळावे तिलाच आता 
" ती " असणे ही आवडते मला

- जुई






ना तुम गलत ना सही

बार बार ये खयाल आये
ना तुम गलत ना मै सही
दिल मे ही ये क्यु दोहराये 
ना  तुम गलत ना मै सही

तितली उडती दूर जाये 
कली उसे जो मिल गयी
रंग कली के उसे बेहकाये
ना तुम गलत ना मै सही

धागा जोडने वाली भी 
तो चुभती है ना एक सुई
काटकर भी जो जोड सके
ना तुम गलत ना मै सही

उडती तितली ओर सुई 
नयी तभी तो लगी नही
सही धागा ओर सही कली 
ना तुम गलत ना मै सही

- जुई

८५. कल्पना

कल्पना 
एकदा पहावं जमतंय का 
आपल्याला 
कल्पना केलेल्या आजवरच्या 
सगळ्या सगळ्या गोष्टी
एका पानावर उतरवायला
एका वाहत जाणाऱ्या प्रवाहाला 
कल्पनेतल्या साहसी, आनंदी विश्वाला
एक पानभर शब्दात आपले सारे 
आयुष्य सजवायला
निळ्या शाईच्या लेखणीतून 
भिजवायला
पण मग असे च एकदा लिहिता लिहिता
अचानक " काही सुचेना "
क्षणभर  वाटले मनाला
मला स्वतःला विसरून गेली का 
" माझी कल्पना " ?

- जुई

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...