निळ्या आभाळी छटा वेगळी
भरते अंतरी एक पोकळी
शब्द भरले भाव उरले
राधा हरीवर भाळली...
तरंग उठले नदी किनारी
मनात उरते मंद बासरी
सावळ छाया मज भिजवाया
बरसून अंगणी गंधाळली
राधा हरीवर भाळली...
- जुई
" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
वाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली निबीड रानात वाट माझी नागमोडी डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या सघन खोऱ्यात वाट माझी भाव...
No comments:
Post a Comment