बोलणारे शब्द असतील
त्यातला तू पर्याय हो
ग्रंथ ही अगणित असतील
त्यातला तू अध्याय हो
गर्दीच आहे चोहीकडे
त्यातला तू समुदाय हो
हात नाहीच सोबतीला
तर धावणारा पाय हो
पोसणारा बाप आहे
तू बिलागणारी गाय हो
कठीण जर काळीज त्यांचे
तर तू दुधाची साय हो
सामर्थ्य इतके ठेव की
लढण्यात तू शिवराय हो
दे प्रेरणा अथवा कुणा
त्याची जिजाऊ माय हो
- जुई
No comments:
Post a Comment