सहज एकदा जाता जाता..
सहज एकदा जाता जाता
वाट बदलली वळणावर
नेहमी काय तोच रस्ता
तुडवत जायचं मैलभर
नुसती वेगळी वाट नाही
हे तर निराळे गावं
तीच वर्दळ मागे टाकून
नव काहीतरी घ्यावं.
वाट नागमोडीची
हसण्याची श्रीमंती
वाटसरू ही इथले
देती मनाला शांती
अमृताहून ही गोड भासल्या
वाहत्या इथल्या नद्या
पर्वत रांगा क्षितिजा वरती
भव्यदिव्य न साध्यासुध्या
गोंधळ तेव्हा कानी पडला
आले मग भानावर
सहज तेव्हा जाता जाता
फिरले होते जगभर...
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment