Friday, 8 January 2021

१०८. अशीच ती

एक वेगळी अशी ती 
म्हणले तर कोरी वही
म्हणले तर ऐकत राहावी
असे ही बरेच काही 

एक वेगळी अशी ती 
म्हणले तर खुशाल चेंडू
हसते, रुसते, समजावते
किती आणि काय मांडू 

प्रेम आणि मैत्री मधला 
एक शिंपल्यातला मोती
अजून ही लिहीत राहावी 
एक वेगळी अशी ती

कवितेत शोधत राहावी 
अशी लपलेली चाल ती
माझ्या हृदयात गुणगुणते
असा रूपक ताल ती

अशी एक वेगळी ...

- जुईली अतितकर
 
 
 

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...