आकाश रिते भासत आहे
मौनात सुद्धा संगीत आहे
एक गोष्ट नवी सांगत आहे
तरल मधुर गाणे आहे
गाण्यात मग्न होणे आहे
चिंब फुलं पाने आहे
पाऊस इथे येणे आहे
चंद्रकोर सजली आहे
वाट सुद्धा भिजली आहे
ओढ मनी कसली आहे
रात्र सुद्धा निजली आहे
" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
चांदणे गोड हासत आहे आकाश रिते भासत आहे मौनात सुद्धा संगीत आहे एक गोष्ट नवी सांगत आहे तरल मधुर गाणे आहे गाण्यात मग्न होणे आहे चिंब फुलं...