Saturday, 17 October 2020

५७. शक्ती रूपेण संस्थिता

ती पणतीची ज्योत, देव्हाऱ्यातली समई

ती फुले रातराणी,  सुगंधी जाईजुई


तिचा अस्तित्वाचा ध्यास, तिची  नजर करारी

तिच्या पंखांची ताकद, घेती उंचच भरारी


तिचा मंजुळच नाद, वाहणारा शुभ्र झरा

तिचे नित्यनियमाचे काम, वाहे जगाचा पसारा


ती मायेचा गं डोंब, ओठी नाव पहिले आई

रोज राबते तरीही, हाल सोसते का बाई


पुंजी ठेवा हो जपून, सरली आता वेळ

तिच्यासाठी आज पुन्हा, जुळे शब्दांचा  हा मेळ



- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...