रोज त्या वाटेत माझ्या
तू मला बोलावते ना
आज वेड्या पावलांनी
थांबलो वाटेत पुन्हा
तू अता हा सोड रूसवा
का तुझ्या डोळ्यात लाटा
साचलेले बोल सारे
मोकळ्या होतील वाटा
सारखे का वाटते या
आस वेड्या भावनांना
मी तसाही थांबलेलो
आज ही तेथेच आहे
त्याच वाटेने तरीही
येत जातो रोज आहे
तू तिथे वाटेत आहे
भास व्हावे शोधताना
जागताना रोज राती
आठवांची साथ होते
पाकळी ही त्या फुलांची
रातराणी गीत गाते
तू तिथे माझ्याच साठी
थांबली आहेस पुन्हा
- जुईली अतीतकर
No comments:
Post a Comment