आज तेथे मांडलेला
डाव होता खेळण्याचा
पाडले बिनचूक फासे
मोह होता जिंकण्याचा
वेळ तेव्हा चोख होती
ना इरादा सोडण्याचा
जिंकण्याला येत होते
खेळ नाही संपण्याचा
सोबतीला चार खाने
धावणारे पाश मागे
थांबले नाही तरीही
बेत होता चालण्याचा
मी पुन्हा आले तरीही
आपल्या जागीच होते
चार माझ्या सोंगटयानी
खेळ केला पाहण्याचा
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment