Sunday, 9 March 2025

साद


काय सांगू आज आता भेटण्या रे साद घाली
याच वेळी आपली ही ज्या ठिकाणी भेट झाली || धृ ||

नेहमीची वाट पाहे धीर आता राहवेना
रोजचा तो एक वादा आज तोची ना बहाणा 
ये असाही आस वेडी ही नव्याने लागलेली ||१ ||

येत आहे मी, तुला भेटावयाला त्या ठिकाणी
थांब थोडे आज राणी बांधलेले आसवांनी
मी तिथे आहे ग होती ज्या ठिकाणी भेटलेली  ||२||

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...