पहा तो कसा आज आला ग आई
भिजूनी मला तो सुगावा ग देई
कसा मी न जाणे तयाला पहावे
कसा त्याच पाण्यात झोकाच घ्यावे
जरासे मनालाच सांगून जाई
भिजूनी मला तो सुगावा ग देई
सरीच्याच खेळात खेळेच वाटे
दुरावा सरीचा कसा हा पहाटे
नको हे बहाणे, नकोती ग घाई
भिजूनी मला तो सुगावा ग देई
ग आई ढगांची असे हीच नीती
असेही मला ना कशाचीच भीती
मला ही ढगांनी खुणावे तुलाही
भिजूनी मला तो सुगावा ग देई
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment