Sunday, 9 March 2025

११५. ओव्या


मोकळ्या रानात 
पेरलं रे मी सोनं
हिरवं माझं हे धन 
मातीतुन ||


राबतो रे दिन रात
मळलेल्या मातीत
दान दळलं जात्यात 
मूठभर ||

पावसाचा कहर 
फुलला नाही बहर
जगणं झालं जहर 
रित्या पोटी ||

घास मजला मिळतो
त्याच्याच कष्टाचा
सूर्य जरी अस्ताचा 
त्याच्या माथी ||

आलं हिरवं अंकुर
जगणं झालं सुखकर
भरलं माझं घरदार 
धन धान्यानी ||

ओवी

पहिली माझी ओवी ग 
महादेवाच्या पिंडीला
बेल पत्र वाहिला
चरणाशी ||

दुसरी माझी ओवी ग
गणरायाच्या मूर्तीला
मोदकाचा घास भरवला
नेवैद्यात ||

तिसरी माझी ओवी ग 
पंढरीच्या विठूला
रुक्मिणी जोडीला
शोभतसे ||

चौथी माझी ओवी ग 
करविराच्या लक्ष्मीला
धनधान्याच्या राशी हो
सौख्याच्या ||

पाचवी माझी ओवी ग 
अयोध्येच्या रामाला
त्रास भोगून उज्ज्वल
केले सूर्य वंशाला ||

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...