Sunday, 9 March 2025

११६.भूपाळी


उठ मुकुंदा जाग रे जाग रे 
उठ मुकुंदा जाग रे जाग रे 
प्रभात झाली, किरणे ल्याली
पसरले चहूकडे तेज हे
उठ मुकुंदा जाग रे जाग रे 

जळी नदीवर भरते पाणी
घागर घेऊन या गौळणी
तव लोण्याचे घडेच आता 
प्रेमाने माग रे माग रे
उठ मुकुंदा जाग रे जाग रे

निजली होती सारी दुनिया
तुझ्या दर्शनी उठली माया 
तव करुणेने फुलले जगती 
भक्तीचेच भाव रे भाव रे
उठ मुकुंदा जाग रे जाग रे

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...