तुजवीण मजला आता नाही पूर्तता
येशील कधी घरी माझ्या रे भगवंता ||
सुख लाभले कणभर मज जे होते
घागरीत सारे दुःखची भरले होते
यावे तू असे दुःख हे सरता सरता ||
कसली रे चिंता मज नसते आता
दिवा ठेविला रे मनी मिणमिणता
तव प्रकाश मजला दे जाता जाता ||
इच्छा ही माझी राहिली उराशी
जग सारे जिंकले तरीही उपाशी
नाही ही असूया नसे कमतरता ||
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment