प्रिय आई...
तू कशी आहेस ?
मायेची, प्रेमाची वाहती नदी आहेस ...
सतत सगळ्यांच्या आवडीचा विचार करणारी
त्यांच्यात स्वतः ला पाहणारी भरलेली वही आहेस ...
तू कशी आहेस ?
लहान मुलांमध्ये रमणारी,
साखरे सारखी विरघळून जाणारी
तू गोड खीर आहेस...
माणसे जोडण्याची तुझी सवय
सगळ्यांना जग जाहीर आहे...
आपले दुःख विसरून आम्हा वर
घातलेली फुंकर जशी आहे
शिवण काम करता करता
सगळ्याना बांधून ठेवणारी दोरी आहेस.
तू कशी आहेस ...
तर तू अशी आहेस ...
No comments:
Post a Comment