सावित्रीने गिरवले
बाया सारे शिकवले
जोतिबाच्या कष्टाचे
जग नवे घडवले
जी जी जी जी
श्रीगणेशा त्यांनी केला
स्त्री शक्तीचा झेंडा पुढे नेला
सावित्री बाई दिसते मला
प्रत्येक यशस्वी महिला
जी जी रे जी जी रे
धरली हाती पाटी
जगाने दाखवली काठी
पण सरले नाही पाठी
अशी जोतिबांची महती
बोला जोतिबाच्या नावाने चांगभलं !
सावित्रीबाईच्या नावाने चांगभलं !
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment