सूर्य उगवला रायगडी
स्वराज्याची बसली घडी
राजा शिवबासाठी पायघडी
रयतेस लागली गोडी
जी जी रे जी जी रे
( तो एक ऐतिहासिक दिवस कोरला गेला होता हर एक मावळ्यांच्या शौर्याचा, विजयाचा, आपल्या स्वराज्याचा तो दिवस होता ६ जून १६७४ या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, राज्याभिषेक सुरू झाला. )
छत्रपती राजा माझा झाला ..
ओ हो ओ हो
छत्रपती राजा माझा झाला .
नेमले त्याने अष्टप्रधानाला
सोयरा बाईने ओवाळले राजाला
सोन्या, चांदीची झाली तुला
जी जी जी जी
(भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने मढवलेले होते.. शिवाजी महाराज सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. प्रजेनी महाराजानाआशीर्वाद दिला. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. )
आई भवानीला पुजले आधी
कौतुके पाहे बाल संभाजी
जिजाऊंच्या आशीर्वादाची
साथ मिळाली राजाला जी
जी जी जी जी
एक गर्जना झाली मोठी
जयघोष राजाचा ओठी
रक्त वाहिले स्वराज्यासाठी
बलिदानाने भरली माती
जी जी रे जी जी रे
एक जयघोष सर्वदूर पसरला
"जय शिवाजी...जय भवानी "
- ©®जुईली अतितकर
No comments:
Post a Comment