ढग रुपेरी ते, खुणावती नभाला
सुख घेऊन रे, चाफा हा बघ आला ||धृ ||
आले मज स्वप्नी, एक गाव उनाड
वळणावर दिसला वट वृक्ष पल्याड
थांबले किंचित सावली आडोशाला ||1||
उतरू नभ खाली, रिमझिमत्या सरी
उंचावर नेई, पंखांची भरारी
आकाश ही ठेंगणे वाटते रे मजला ||2||
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment