Sunday, 9 March 2025

११३. गोंधळ


गोंधळ

ये गोंधळाला आई गोंधळाला ये
बोलावते जी आंबे गोंधळाला ये

दिवटी मशाल आई उभी सामोरी
त्रिशूळ घेऊन जग हे माझे उद्धारी
माळ कवड्याची घालून गोंधळाला ये
बोलावते जी आंबे गोंधळाला ये

भाळी मळवट भरून पाठीशी माता
चुकलो मुकलो माफी करिसी भक्ता
शाल शक्तीची घालून गोंधळाला ये
बोलावते जी आंबे गोंधळाला ये
उदे ग अंबा बाई...आई 
उदे ग अंबा बाई ...आई

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...