आयुष्याचे नाटक बसवताना, आपण सुद्धा घडत असतो.
चिमुकल्या पावलांनी, आपल्याच वेगात, मोठाले पर्वत चढत असतो.
या नाटकाची नांदी पाळण्यात होते, पण पडदा पुन्हा पुन्हा पडत असतो
चेहऱ्यावरचे रंग बदलत असतात,
कधी उदास तर कधी हसवत असतात,
स्वतःला आपण त्या रंगांमध्ये, चलाखीने लपवत असतो,
आवडत्या नावडत्या, वाटतात काही भूमिका,
आपल्या नाटकाची, लिहितो कोणी संहिता
पडद्याआडचे विघ्न दिसत नसते, अभिनय मात्र दिसंत असतो
रंगमंच नवा असतो,
प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी हवा असतो,
त्यावर आपण रडत असतो, हसत असतो
किती तरी वेळा पडत असतो,
भूमिका संपली , पडदा पडला, की त्या नाटकातली एक आठवण मात्र जोडत असतो,
आयुष्याचे नाटक बसवताना, आपण सुद्धा घडत असतो.
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment