Sunday, 9 March 2025

पाऊस पाणी ऊन सावली

 

पाऊस पाणी ऊन सावली

जिथे राबली माय माऊली

अशा माझ्या शिवारावर

एक दिवा तू लावून ये

जिथे पोरकी झाली माया

फुल सुगंधी गेले वाया

अशा उमलत्या एक कळीवर

एक दिवा तू लावून ये

एक कोपरा या हृदयीचा

माग काढतो त्या हृदयाचा

त्या माझ्या हृदयात सख्या
एक दिवा तू लावून ये

- ©®जुई

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...