Sunday, 9 March 2025

११९. मैत्रीच्या वाटेवर जाता

 

मैत्रीच्या वाटेवर जाता

असंख्य दिसती चेहरे

कुणी कोणाला माहीत नसते

तरी होतात सोयरे

मित्रा, या वाटेवर बघ

अडवळणाच्या वाटा

वाढत जाईल तुझ्या जवळचा

आठवणींचा साठा

जग हे सारे बदलत गेले

तरी ठेव मैत्र स्वतःशी

हरवत नाही वाट तुझी मग

सापडते तुझ्याच पाशी

- जुई ✍️

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...