सवाल :
ऐका ...
अवघड वाटे पूर्वी
अन सोपे ही वाटावे
कुतूहल भारी आधी
नंतर अनुभव येती ग
वेगवेगळे स्वभाव आणि वेगळे वेगळे घरटे ग
वेगवेगळी नवीन नाती उंबर्यात बोलवती ग...
स्वप्न पडावी दिवस राती
सांग बंधन कुठले ग
जी जी जी जी
माझे बई तू ग माझे सखये तू ग हे हे हे हे हे हा...
जवाब :
ऐका
उत्तर असले सोपे तरी
समजून घ्यावे पदोपदी
सुख दुःखाच्या संसाराची
चालावी सोबत सप्तपदी
नाती असली नवी तरी
निभवावी ती प्रेमाने
उत्तर याचे शोधण्या ग
लग्नबंधनात ही तू येणे
जी जी जी जी
माझे बई तू ग माझे सखये तू ग हे हे हे हे हे हा...
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment