धुंद आज तू ही व्हावे, धुंद आज मी व्हावे
मिलनी तुझ्या नी माझ्या, नभी चांदणे फुलावे...||
रात ही पौर्णिमेची, आपल्या साथीची
फुले आठवांची, आपल्याच प्रीतीची...
कधी तू, कधी मी एकमेकांत गुंतून जावे...
मिलनी तुझ्या नी माझ्या, नभी चांदणे फुलावे...||
गोड गुपित तुझ्या मनीचे, अल्लड तुझ्या हसण्याचे
कळले आहे मज आता अर्थ सारे गाण्याचे
साथीला आज मी, तू ही मग एकसुर व्हावे ....
मिलनी तुझ्या नी माझ्या, नभी चांदणे फुलावे...||
चंद्र हि लाजला आकाशी आपल्या मिलनाला
आज सखे तुझ्यातला चंद्र मी पाहिला
शिंपडावे आज चांदणे, आतुर मन त्यात झुलावे...
मिलनी तुझ्या नी माझ्या, नभी चांदणे फुलावे...||
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment