सख्या सांगना, माझा काय गुन्हा
वेगळा हा भाव, मला का कळेना..||धृ||
रस्ता आपला,आज कसा चुकला
काटा फुलांचा, मनाला कसा रुतला
फुललेला संसार आपला, झाला जुना
वेगळा हा भाव, मला का कळेना......||1||
रोजचा तो तुझाच रे, रुसण्याचा बहाणा
आज रुसले मी एकदा, मलाही पहाना
हट्टाला पेटलासी हा, खेळ झाला जुना
वेगळा हा भाव, मला का कळेना......||2||
मनीच्या स्वप्नांना परस्परांचा होता सहारा
विसरलास तू मला, वाढवूनी हा पसारा
स्वप्नात एकदा आता भेटशील का पुन्हा
वेगळा हा भाव, मला का कळेना....||3||
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment