Sunday, 9 March 2025

शेतातून दिनरात


शेतातुनी दिनरात माझा धनी राबतो
घामाने पिकवून मोती जगाला पोसतो

कोरलेल्या भाळी त्याच्या कष्टच भारी
जिंदगी उसनी झाली मागून रोज उधारी
आटला ग थेंब डोळा जगासाठी हसतो...||

माखलेला हात त्याचा मातीच्या चिखलाने
पावसाला शोधत शोधत शिवारी जाणे
मळक्या हातात त्याच्या देव मला दिसतो ||

पावसाचा कहर झाला लांबले मग येणे
नुसतीच हुरहूर लावून विसरून जाणे
मोकळ्या रानात तेव्हा मूग गिळून बसतो ||

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...