Wednesday, 12 March 2025

चालताना

चालताना चालताना एकदा पण सावरावे 
वाट चुकली चालताना तर कशाला घाबरावे 
रात्र येते सायंकाळी चांदणे सोबत असावे
दिसत नाही पुढे तेव्हा तेथे स्वतःला थांबवावे
शब्द द्यावे शब्द घ्यावे मनामध्ये घोळवावे
पंख त्यांचे पाहताना मी ही ते आकाश व्हावे

 - जुई

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...