Sunday, 30 April 2023

९७. आठवते

तिच्या आवडी, तिची काळजी
तिचे बोलणे आठवते 
ती नसल्यावर हसणे, रुसणे
सोबत असणे आठवते 

जगावेगळे नसते काही
तिची तिची दुनियादारी 
तिच्यात लपले विश्व सानुले
तिचे पाहणे आठवते

कसले कौतुक असते
आणि कधी निराशा स्वप्नांची
इतके नव्हते केले मी पण 
तिचे सांगणे आठवते 

असतो मी ही कधी कोरडा
तिची ओल पण मायेची
नसते काही बोलायाचे
पण सावरणे आठवते

फक्त एकदा म्हणालीस तू
सोबत राहू आपण दोघे
अजून ही किनाऱ्यास त्या
तिचे परतणे आठवते

- जुई

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...