इतके नाजूक इतके साधे असते काही
दूर तिथे त्या वेलीवरती फुलते काही
इतके अवघड इतके सोपे नसते काही
गणित असते आयुष्याचे सुटते काही
रित्या मनाला माया, ममता भरते काही
भरते भरते म्हणता मागे उरते काही
कळत नकळत फुलास तेव्हा कळते काही
कळता कळता नवे नवेसे जुळते काही
इतक्या इवल्या फुलामध्ये दरवळते काही
दूर तिथे त्या वेलीवरती फुलते काही
- जुई
No comments:
Post a Comment