तो गजबजलेले शहर
मी अज्ञात वेगळे गाव
त्याची रोजचीच ती वळणे
माझी नदी प्रवाही धाव
तिथे रस्त्यावरची वर्दळ
कट्टा, गल्ली नि चौक
गावच्या पायवाटेवर
कौलारू माझे सुख
तिथे स्वप्नांची ही गर्दी
शहराच्या प्रवेशद्वारी
निरखून पाहते सारे
तरी फिरते ना माघारी
तो जर गजबजलेले शहर
पेरले तिथे ही गावपण
शहराच्या मध्ये तो ही
शोधतो गावचे अंगण
- जुई
No comments:
Post a Comment