Sunday, 11 April 2021

७२. जीवन यात्रा


कळ्या उमलत्या जशा पहाव्या 
तशी पहावी दुनिया सारी 
रोप सानुले वाढत न्यावे
प्रेमाने नात्यांच्या दारी

वाढत गेले कधी कळेना
मैत्रीचे हे अतूट नाते
वाट निमुळती अरुंद एकच
दोघांच्या ही मधून जाते

रंग वेगळे असले तरीही
लोभस भासे दुनियादारी
ज्याने त्याने करून पहावी
जीवन यात्रा जगात न्यारी

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...