Saturday, 27 February 2021

७१. खुल्या मनाचा दर्दी


ती वाट वेगळी होती शोधले वेगळे काही
शोधून बघितले सारे भेटले वेगळे नाही
मी खुल्या मनाचा दर्दी हिंडल्या दिशा मी दाही
वाढली अचानक गर्दी पण वाट भटकलो नाही

वेदना स्पर्शूनी गेल्या पोकळी सारखी वाही
वाहून जावया त्यांना तो मार्ग मिळाला नाही
कालच्या वेगळ्या होत्या आजच्या वेगळ्या आहे
वेदनाच उरते मागे मी सौख्य शोधतो आहे

ह्या रेतीवरच्या लहरी वाहून आणती काही
मग पुसून जाते सारे सारखी हवी नवलाई
कोरून ठेवल्या रेषा मावळत्या एक किनारी
हे मृगजळ वाळूवरचे लाटांची किमया सारी

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...